अट्रावल येथे केळीच्या शेतात शेतकर्यावर प्राणघातक हल्ला
यावल : यावल तालुक्यातील अट्रावल या गावालगत असलेल्या केळीच्या शेतात मंगळवारी दुपारी बकर्या शिरल्या व त्यांनी केळी पिकाचे नुकसान केल्याने 49 वर्षीय शेतकर्यांने गुराख्यास हटकल्यानंतर त्यास तिघांनी मारहाण केली तसेच डोक्यात काठी मारल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला. शेतकर्यावर यावलला प्रथमोपचार करून जळगावी हलवण्यात आले.
हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
अट्रावल, ता.यावल येथील शेतकरी रवींद्र पंडित कोळी (49) यांचे गावालगत शेत गट क्रमांक 103 आहे. यात त्यांनी केळी लागवड केली आहे तर या केळीच्या शेतात मंगळवारी दुपारी बकर्या शिरल्या आणि त्यांनी केळीचे नुकसान केले. शेतकर्याने या बकर्या बाहेर काढून गुराखी शुभम प्रदीप कोळी व त्याच्या सोबत असलेल्या इतर दोघांनी सांगीतले की, बकर्या व्यवस्थित चराई करा, त्यांनी केळीचे नुकसान केले. या बोलण्याच्या रागातून या तीन जणांनी शेतकरी रवींद्र कोळी यांना शिविगाळ करीत मारहाण केली व त्यांच्या डोक्यात काठीने वार करीत जबर दुखापत केली. जखमी अवस्थेत कोळी यांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेे त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्रथमोपचार करीत जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

