यावल वनविभागाच्या गस्ती पथकाकडून लाखाचे अवैध लाकूड जप्त


यावल : वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर त अवैद्यरित्या कटाई केलेल्या लाकडाची वाहतूक करतांना चारचाकी वाहनासह लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहन चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
11 जून रोजी रात्रीच्या सुमारास वन विभागास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर वनविभागाने सापळा रचून यावल शहरातील फैजपूर रस्त्यावरील मनुदेवी मंदिराजवळ टाटा कंपनीचे वाहन क्रमांक (एम.एच.18 बी.जी.2153) या वाहनाची झडती घेतली असता त्यात विनापरवाना अवैध लाकूड भरलेले दिसून आले. वाहन चालकाकडे लाकूड वाहतुकीसंदर्भात परवाना नसल्याने वाहन जप्त करीत शासकीय मुख्य विक्री केंद्र, यावल येथे आणून जमा करण्यात आले. निम जळावू लाकूड घ.मी. 35 मीटर आढळल्याने गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई वनपरीक्षेत्र अधिकारी आनंदा पाटील, वनपाल रमेश थोरात, वनपाल रानुदास जाधव, वाहन चालक आनंद तेली यांच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !