हिंगोणा गावातील कुंभारवाडा भागातून दोन बैलजोडींची चोरी
Theft of two pairs of bullocks from Kumbharwada area of Hingona village यावल : यावल तालुक्यातील हिंगोणा या गावात कुंभार वाड्यात एका शेतकर्याने आपल्या घराबाहेर बांधलेल्या दोन बैल जोडींची चोरी झाली आहे. 80 हजार रूपये किंमतीचे हे चार बैल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याचे निर्दशनास आल्यानंतर गुरुवारी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध बैल जोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
हिंगोणा, ता.यावल येथील कुंभारवाड्यात अनिल शामराव धनगर हे राहतात. त्यांनी आपल्या घराबाहेर 80 हजार रुपये किंमतीचे चार बैल अर्थात दोन बैल जोड्या बांधल्या होत्या.घराबाहेर बांधलेल्या या दोन्ही बैलजोड्या कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्या. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी त्यांनी सर्वत्र चौघा बैलांचा शोध घेतला मात्र बैल कुठेच मिळून आले नाही म्हणून फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश बर्हाटे करीत आहे.

