अति तापमानात यावल तालुक्यातील सर्व मंडळाचा समावेश न केल्यास आंदोलन

महाविकास आघाडीच्या वतीने यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना निवेदन


यावल : हवामानावर आधारित पुनर्रचित फळ पीक विमा योजनेत यावल तालुक्यातील एकाही महसूल मंडळातील अति तापमानात (45 अंश सेल्सिअस) नोंद नसल्याने केळी उत्पादकांवर झालेला अन्याय त्वरित आठ दिवसात दूर करून अति तापमानामध्ये यावल तालुक्याचा समावेश करण्याची मागणी येथील महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी येथील तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना निवेदन देवून करण्यात आली. अन्याय दूर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

केळी उत्पादक भरपाईपासून वंचित
मे महिन्यातील 16 ते 25 तारखेपर्यंत तालुक्यातील सर्वच महसुली मंडळात तापमान 46 अंश सेल्सियसपेक्षा जास्त राहील्या नंतरही अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या हवामान यंत्रणेकडून मात्र तालुक्यातील एकाही महसुली मंडळात 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद दर्शविली नसल्याने केळी उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित राहणार आहे. अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून तालुक्यातील केळी उत्पादकांची थट्टा मस्करी केली जात असल्याची भावना तहसीलदार नाझीरकर यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आली. येत्या आठ दिवसात हवामान यंत्रणेचा अहवाल मागवून तापमानाच्या अहवालाची सखोल चौकशी करून यावल तालुक्यातील संपूर्ण मंडळाचा अती तापमानात समावेश करावा अन्यथा महाविकास आघाडीकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) तसेच शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या वतीने स्वतंत्रपणे दिलेल्या निवेदनात केला आहे.



यांची निवेदनावर स्वाक्षरी
निवेदनावर प्रा.मुकेश येवले, अतुल पाटील, कदीर खान, विजय पाटील, अब्दुल सईद, हाजी अकबर खाटीक, अ‍ॅड.कोमलसिंग पाटील, गिरीश क्षीरसागर, ललित विठ्ठल पाटील, सहदेव पाटील, पांडुरंग पाटील, संतोष तायडे, निलेश बेलदार, गजानन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, निवृत्ती पाटील, अनिल जंजाळे, जगदीश कवडीवाले, संतोष खर्चे, डॉ.विवेक अडकमोल, सारंग बेहेडे, राजेश श्रावगी, शहाजी भोसले, शरद कोळी, विकास बारेला, बाळकृष्ण पाटील, बळवंत निंबाळकर, प्रल्हाद बारी यांच्यासह महाविकास आघाडीच्या सुमारे 50 कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !