राजोरा गावातून घराबाहेर लावली टीव्हीएस ज्युपिटर स्कूटर चोरी


यावल : यावल तालुक्यातील राजोरा गावात घराबाहेर लावलेली टीव्हीएस ज्युपिटर स्कूटर अज्ञात चोरट्याने चोरी केली. हा प्रकार हा शुक्रवारी सकाळी निदर्शनास आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

राजोरा, ता.यावल या गावात पंडित कडू उंबरकर हे राहतात. त्यांनी आपल्या घराच्या बाहेर टीव्हीएस ज्युपिटर कंपनीची स्कूटर (क्रमांक एम.एच.19 ई.ई. 6132) ही लावली असता चोरट्यांनी संधी साधली. सर्वत्र शोध घेवून ही स्कूटरचा शोध न लागल्याने यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन चव्हाण करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !