भुसावळात पालिकेने डॉ.आंबेडकर व्यापारी संकुलासमोरील अतिक्रमण काढले
In Bhusawal, the municipality removed the encroachment in front of Dr. Ambedkar Business Complex भुसावळ : भुसावळ शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलासमोर मूर्तीकाराने पत्री शेडचे अतिक्रमण केल्यानंतर त्यास नोटीस बजावण्यात आली मात्र त्यानंतरही अतिक्रमण कायम असल्याने शुक्रवारी पालिकेचे पथक अतिक्रमणावर हातोडा मारण्यासाठी गेले असता अतिक्रमणधारकांने स्वत:च अतिक्रमण काढून घेतले.
शहरातील अन्य अतिक्रमणही हटवावे
शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे पालिकेकडून अतिक्रमणधारकांना नोटीस बजाविण्यात येत आहे, नोटीस बजाविल्यावर सुध्दा अतिक्रमण काढले जात नसल्याने पालिकेच्या रडारवर असे अतिक्रमणधारक आहे. त्यामुळे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथक प्रमुख नंदकिशोर यवतकर यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन करण्यात आले असून पथक अतिक्रमण काढत आहे.

शुक्रवारी सुध्दा दुपारी 12 वाजेच्या सुमारास पथक अतिक्रमणाच्या जागेवर पोलीस बंदोबस्तात गेले मात्र पथकाकडून कारवाई सुरू होण्यापूर्वीच संबंधिताने अतिक्रमण काढून घेतले. यावेळी उपमुख्याधिकारी लोकेश ढाके, नंदीकीशोर यवतकर, रितेश बच्छाव, वैभव पवार, अनिल भाकरे, गोपाळ पाली यांच्यासह पोलीस व पालिका कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, गोरगरीबांचे अतिक्रमण हटवले जात असताना धनदांडग्यांच्या अतिक्रमणावर कारवाई कधी पालिका करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.




