साकेगाव येथून अल्पवयीन तरुणीस पळवले


A minor girl was abducted from Sakegaon भुसावळ : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथून 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीस अज्ञाताने काहीतरी फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या पित्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
मध्यप्रदेशातील गाडर्‍या येथील मूळ रहिवासी कुटूंब साकेगाव येथे उदरनिर्वाहनिमित्त वास्तव्यास आहे. या कुटूंबातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञाताने काहीतरी फूस लावून व आमिष दाखवून पळवून नेले. ही घटना 14 ते 15 जूनदरम्यान घडली. मुलीचा सर्वत्र शोध घेवूनही तपास न लागल्याने मुलीच्या पित्याने भुसावळ तालुका पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय भोई करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !