यावल शहरातील उच्च शिक्षित तरुणाचा ईमारतीवरून पडल्याने मृत्यू
A highly educated youth in Yaval city died after falling from a building यावल : शहरातील महाजन गल्लीतील 27 वर्षीय उच्च शिक्षित सॉप्टवेअर इंजिनिअर तरुणाचा राहत्या घराच्या दुसर्या मजल्यावर पडल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अक्षय प्रमोद करांडे (27) असे मयताचे नाव आहे.
तोल जावून पडल्याने मृत्यू
अक्षय हा तरुण उच्चशिक्षीत सॉप्टवेअर इंजिनिअर होता. सोमवार, 17 जुन रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास तो आपल्या राहत्या घराच्या दुसर्या मजल्यावर होता व अचानक त्याचा तोल गेला व तो जमिनीवर कोसळला. डोक्यास जबर दुखापत झाल्यानंतर त्यास कुटुंबीयांनी भुसावळ शहरातील खाजगी रुग्णालयात हलवले. मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मयत अक्षय करांडेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन भुसावळ येथे ट्रामा सेंटरमध्ये करण्यात आले.

