भरधाव ट्रकने उडवल्याने पाच महिला ठार : तिघे गंभीर


सोलापूर : नियंत्रण सुटलेल्या आयशर ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या महिलांना चिरडल्याने पाच जणींचा मृतयू ओढवला तर तिघे गंभीर जखमी झाल्या. पंढरपूर -कराड रोडवरील कटफळ फाट्यावर हा भीषण अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

एकास पोलिसांनी केली अटक
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तसेच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर एक जण पळून गेला आहे तर एकाला पोलिसांनी अटक केली आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या महिलांच्या कुटुंबियांप्रती स्थानिक नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

मृत कटफळच्या रहिवासी
अपघातील मृत आणि जखमी महिला सांगोल्यातील कटफळ येथील रहिवासी आहेत. या महिला मोलमजुरीचे काम करण्यासाठी चिकमहूद येथील शेतकर्‍यांच्या शेतावर गेल्या होत्या. मंगळवारी काम संपल्यानंतर दुपारी घरी जाण्यासाठी त्या पंढरपूर – कराड रोडवर एसटीची वाट पाहत थांबल्या होत्या. त्याचवेळी पंढरपूरकडून भरधाव जाणार्‍या ट्रकने त्यांना उडवले. मंगळवारी दुपारी चार वाजता हा भीषण अपघात झाला. आयशर ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने थेट या सातही महिलांना चिरडले. या सर्व महीला या कटफळ येथील रहिवासी आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !