रेल्वेचा पुन्हा मेगा ब्लॉक : 14 गाड्या रद्द ; आठ गाड्यांच्या मार्गात परिवर्तन

पुणे विभागात दुहेरीकरण कामासाठी ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक


Railway Mega Block again: 14 trains cancelled ; Alterations in the route of eight trains भुसावळ  : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड आणि मनमाड विभागातील पुणतांबा आणि कान्हेंगाव स्थानकांदरम्यान दुहेरीकरण सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक 17 ते 28 जूनदरम्यान घेण्यात येणार असून अप-डाऊन मार्गावरील 14 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून चार गाड्यांच्या मार्गात परिवर्तन तर चार गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.

या रेल्वे गाड्या रद्द
गाडी क्रमांक 01922 वीरांगना राणी लक्ष्मीबाई झाँसी-पुणे स्पेशल गाडी 19 व 26 जून रोजी रद्द, गाडी क्रमांक 01921 पुणे-वीरांगना राणी लक्ष्मीबाई झाँसी स्पेशल गाडी 20 व 27 जून रोजी रद्द, गाडी क्रमांक 07623 नांदेड-हडपसर स्पेशल एक्स्प्रेस 19 जून रोजी रद्द, गाडी क्रमांक 07624 हडपसर-नांदेड स्पेशल एक्स्प्रेस 20 जून रोजी रद्द, गाडी क्रमांक 02132 जबलपूर-पुणे स्पेशल एक्स्प्रेस 23 जून रोजी रद्द, गाडी क्रमांक 02131 पुणे-जबलपूर स्पेशल एक्सप्रेस 24 जून रोजी रद्द, गाडी क्रमांक 22223 मुंबई-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस 29 व 30 जून रोजी, गाडी क्रमांक 22224 साई नगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस 29 व 30 रोजी रद्द, गाडी क्रमांक 22147 दादर -साईंनगर शिर्डी साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस 28 जून रोजी रद्द, गाडी क्रमांक 22148 साईंनगर शिर्डी-दादर साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस 29 जून 2024 रोजी रद्द, गाडी क्रमांक 12131 दादर-साईंनगर शिर्डी त्री-साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस 29 जून रोजी रद्द, गाडी क्रमांक 12132 साईंनगर शिर्डी -दादर त्री-साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस 30 जून रोजी रद्द, गाडी क्रमांक 11041 दादर-साईंनगर शिर्डी एक्सप्रेस (व्हाया पुणे) 29 जून रोजी रद्द व गाडी क्रमांक 11042 साईंनगर शिर्डी-दादर एक्सप्रेस 30 जून रोजी रद्द करण्यात आली आहे.



आठ गाड्या उशिराने धावणार
12103 पुणे-लखनऊ साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस 18 व 25 रोजी 90 मिनिटे उशिराने धावेल तर 22845 पुणे-हटिया द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस 19 व 26 रोजी 90 मिनिटे उशिराने धावणार आहे. 11026 अमरावती-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस 20 व 23 रोजी 90 मिनिटे उशिराने धावणार आहे. गाडी क्रमांक 12627 बेंगलुरु-नई दिल्ली कर्नाटक सुपरफास्ट एक्सप्रेस 29 जून रोजी दोन तास उशिराने धावेल तर 12628 नई दिल्ली -बेंगलुरु कर्नाटक सुपरफास्ट एक्सप्रेस प्रवास 23 जून रोजी 90 मिनिटे उशिराने धावेल. गाडी 11025 पुणे-अमरावती हुतात्मा एक्स्प्रेस प्रवास 19, 20, 21, 24, 25, 26, 27, 28 जून 2024 रोजी आपल्या निर्धारीत वेळेपेक्षा 90 मिनिटे उशीराने पुणे स्थानकावरून सुटेल. 22148 साईंनगर शिर्डी-दादर साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस 22 जून 2024 रोजी 60 मिनिटे उशीरा साईनगर शिर्डी स्थानकावरून सुटेल. गाडी क्रमांक 05609 हडपसर-गुवाहाटी विशेष गाडी 27 जून 2024 रोजी आपल्या निर्धारीत वेळेपेक्षा दोन तास 30 मिनिटे उशीरा हडपसर स्थानकावरून सुटेल.

चार गाड्यांच्या मार्गात बदल
17629 पुणे-नांदेड़ एक्सप्रेस 25 ते 29 जूनदरम्यान कुर्डुवाडी-लातूर रोड -परळी-परभणी मार्गे धावेल तर 17630 नांदेड-पुणे एक्सप्रेस 26 ते 30 जून पर्यंत कुर्डुवाडी-लातूर-परळी-परभणी मार्गे धावणार आहे. 11078 जम्मूतवी -पुणे झेलम एक्सप्रेस 27 व 28 जून 2024 रोजी मनमाड, कोपरगाव, अहमदनगर दौंड कॉर्ड लाईनऐवजी इगतपुरी-कल्याण-पनवेल-मार्गे पुणे धावेल तर 12780 हजरत निजामुद्दीन-वास्को गोवा सुपरफास्ट एक्सप्रेस 28 आणि 29 जून 2024 रोजी मनमाड, कोपरगांव, अहमदनगर दौंड कॉर्ड लाईनऐवजी ईगतपुरी-कल्याण-पनवेल-पुणे मार्गे पुढे नियमित मार्गाने धावणार आहे.

चार गाड्या शॉर्ट टर्मिनेट
17002 सिकंदराबाद-साईंनगर शिर्डी द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस 28 जून रोजी मनमाड स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल व ही गाडी मनमाड ते साईनगर शिर्डी दरम्यान रद्द असेल. गाडी क्रमांक 17001 साईंनगर शिर्डी -सिकंदराबाद द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस 29 जून 2024 रोजी साईनगर शिर्डी ऐवजी मनमाड़ येथून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल. गाडी साईनगर शिर्डी ते मनमाड दरम्यान रद्द असेल. गाडी क्रमांक 20857 अप पुरी-साईंनगर शिर्डी साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस, 28 जून 2024 रोज मनमाड स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. ही गाडी मनमाड ते साईनगर शिर्डी दरम्यान रद्द असेल. गाडी क्रमांक 20858 डाऊन साईंनगर शिर्डी-पुरी साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस 30 जून 2024 रोजी शिर्डी ऐवजी मनमाड येथून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल. गाडी साईनगर शिर्डी ते मनमाड दरम्यान रद्द असेल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !