वड्री येथे 23 वर्षीय तरुणीस आठ संशयीतांची मारहाण
A 23-year-old girl was beaten up by eight suspects in Vadri यावल : यावल तालुक्यातील वड्री या गावातील 23 वर्षीय तरुणीला किरकोळ कारणावरून गावातीलच आठ जणांनी एकत्र येऊन शिवीगाळ करीत काठीने मारहाण केली व तिला ठार मारण्याची धमकी दिली. तरुणीच्या हातावर, मानेवर आणि खांद्यावर दुखापत झाली. ही घटना सोमवारी घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आठ जणांविरूध्द दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे मारहाण प्रकरण
वड्री, ता.यावल या गावातील रहिवाशी मीना परवेझ तडवी (23) ही तरुणी आपल्या घराच्या बाहेर बसली असताना त्या ठिकाणी जुभेदाबाई राजू तडवी, मेगाबाई कलिंदर तडवी, मीनाबाई बिर्हाम तडवी, रेहान इरफान तडवी, बिर्हाम कलिंदर तडवी, इरफान राजू तडवी, कलिंदर सिकंदर तडवी व राजू सिकंदर तडवी (सर्व रा.वड्री) हेे आठ जण आले व त्यांनी किरकोळ कारणावरून या तरुणीला शिवीगाळ करून मारहाण केली, लाकडी काठीने तिच्या हातावर, पायावर मारून दुखापत केली व तिची ओढाताण केली. याप्रकरणी 23 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात आठ जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.

