बोदवड तालुक्यात दुबार पेरणीचे संकट


बोदवड :  बोदवड तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. बोदवड तालुक्यातील तीन मंडळात हवामान केंद्र आहे. त्यात बोदवडसह करंजी व कोल्हाडीचा समावेश आहे मात्र बोदवड परिसरात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही तर 23 मिलीमीटर पाऊस झाल्याचे बोदवड तालुका कृषी अधिकारी तडवी यांनी सांगितले. शेतकर्‍यांनी जोपर्यंत शंभर मिलीमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत पेरनी करू नये तसेच पीक विमा सुध्दा काढावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

हवामान केंद्राचा पत्ताच नाही
बोदवड तालुक्यातील मनुर बु.॥ येथे हवामान केंद्र होते मात्र तिथे ते केंद्र नसून सामानही शिल्लक नाही. मनुर बु.॥ येथील हवामान केंद्र चोरीला गेले की कुणी काढून नेले ? असा प्रश्न आहे. मनुर बु.॥ येथील सरपंच यांना विचारले असता ते म्हणाले की, आमच्या कार्यकाळात हे हवामान केंद्र नव्हते. आम्ही ग्रामपंचायतीकडून नवीन हवामान केंद्र बसवण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हवामान केंद्र मनुर बु.॥ येथे बसवले जाते व ग्रामपंचायतीत कोणत्याही प्रकारची नोंद नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मनुर गावातील हवामान केंद्र गेले कुणीकडे ? असा प्रश्न आहे. तालुका कृषी अधिकारी पाडवी यांनी मनुर येथे हवामान केंद्र नसल्याचे सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !