रावेरात ट्रीपल तलाक दिल्या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल
रावेर : पत्नीला मारहाण करून तोंडी तिन वेळा तलाक म्हणून तलाक दिल्या प्रकरणी पती विरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रावेर शहरातील फतेह नगर भागातील पाण्याच्या टाकीजवळ ही घटना घडली. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली.
पतीविरोधात गुन्हा दाखल
शबनमबी हिने पती ईस्माईल शेख यास तुझे बाहेर अनैतीक संबध आहे का? असा जाब विचारल्याने संप्तत झालेल्या पती इस्माईल शेख याने पत्नी शबनमबी हिला मारहाण करीत आजसे.. मैं तुम्हे तलाक दे रहा हु..असे तिन वेळा तलाक…म्हणून तू माझी पत्नी नाही, असे म्हणून शबनम बी. ला तोंडी तलाक दिला. शबनम बी. हिने रावेर पोलिसात धाव घेत फिर्याद दिल्यावरून रावेर पोलिसात पतीविरुद्ध मुस्लिम महिला विवाह अधिकार संवरक्षण अधिनियम 2019 च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक किशोर सपकाळे करीत आहे.

