पिंपळगाव खुर्द येथील 25 वर्षीय तरुणीसोबत अतिप्रसंग


भुसावळ : भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द गावातील आसरा देवी मंदिराजवळ बकर्‍या चारण्यासाठी आलेल्या 25 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना बुधवार, 19 रोजी सकाळी साडेआठ वाजता घडली. याप्रकरणी संशयीत अजय कैलास पाटील (पिंपळगाव खुर्द) विरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडीतेच्या तक्रारीनुसार, संशयीताने पीडीतेशी अश्लील शब्दात संवाद साधून तिचा पाठलाग करीत तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला मात्र पीडीतेने स्वतःची सुटका करीत पळ काढत पोलिसात तक्रार दिल्यावरून विनयभंग व अ‍ॅट्रासिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !