मे महिन्यात वादळाचा तडाखा : रावेर तालुक्यात 51 कोटींचे नुकसान

केळी उत्पादकांवर अस्मानी-सुलतानी संकट : भरपाईची अपेक्षा


May storm: Damage of 51 crores in Raver taluka रावेर : मे महिन्यात रावेर तालुक्यात झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कृषी विभाग व महसूल विभागाने नुकसानीचा अंतीम अहवाल शासनाकडे सादर केला आहे. रावेर तालुक्यात केळी बागांचे 51 कोटी तीन लाख 296 रुपयांचे नुकसान झाल्याचे अहवाल शासनाकडून सादर करण्यात आला आहे.

44 गावांमधील केळीला फटका
1 मे ते 31 मे दरम्यान वादळी वार्‍यामुळे रावेर तालुक्यातील 44 गावांमधील ऐन कापणीला आलेली केळी जमीनदोस्त झाली. लागवड क्षेत्र दोन हजार 302 हेक्टर पैकी तब्बल 1148.34 हेक्टर केळी जमीनदोस्त झाली. त्यात सर्वाधिक नुकसान हे पुरी येथील 113 शेतकर्‍यांचे 113.76 हेक्टरवर झाले तर रोझोदा येथील 114 शेतकर्‍यांची 87.74 हेक्टर केळी, खिरोदा प्र.यावल येथील 224 शेतकर्‍यांची 276 हेक्टर केळी, कळमोदा येथील 140 शेतकर्‍यांची 132 हेक्टर केळी, सावखेडा येथील 171 शेतकर्‍यांची 187.47 हेक्टर केळी, अटवाडा येथील 127 शेतकर्‍यांची 195.56 हेक्टर केळी बाधीत झाली आहे. रावेर तालुक्यातील एकूण 44 गावांमधील एक हजार 950 शेतकर्‍यांचे 1148.34 हेक्टर केळी बागांचे नुकसानीचे पंचनामे करून सुमारे 51 कोटी तीन लाख 22 हजार 296 रुपयांच्या नुकसानीचा अंतीम अहवाल तहसीलदार बी. ए.कापसे कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांनी शासनाकडे सादर केला आहे. केळी उत्पादकांना आता ठोस भरपाईची अपेक्षा आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !