बालिका हत्याकांडातील आरोपीला ताब्यात देण्यासाठी भुसावळात महामार्ग रोखला

दिडशे जणांच्या जमावाविरोधात भुसावळात गुन्हा : पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज


The highway was blocked in Bhusawal to detain the accused in the girl child murder case भुसावळ : जामनेर तालुक्यातील एका गावातील अल्पयीन बालिकेची अत्याचार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेतील आरोपी सुभाष उमाजी भिल (35) यास भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी जुगादेवी परिसरातून अटक केल्याची माहिती पीडीतेच्या आप्तपरिवाराला कळताच शंभर-दिडशे जणांच्या आक्रमक जमावाने जामनेर रोडवरील भुसावळ तालुका पोलीस ठाण्याबाहेर जमत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली व त्यानंतर नाहाटा चौफुलीबाहेर रास्ता रोको केला. ही घटना गुरुवार, 20 ते रोजी रात्री नऊ ते 10.30 दरम्यान घडली. या घटनेनंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली. बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघन व सहकार्‍यांनी धाव घेत वाहतूक नियंत्रीत करीत जमावाला पांगवले. बेकायदा जमाव जमवून रास्ता रोको केल्याप्रकरणी दिडशे जणांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जागेवरच फैसला करण्याची जमावाची भूमिका
आरोपी सुभाष भिल हा बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात असल्याचे कळताच आदिवासी बांधवांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्याभोवती गर्दी करीत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली. ‘इसका फैसला हम करेंगे’ म्हणत जमावाने तीव्र रोष व्यक्त करीत नाहाटा चौफुली गाठत तेथे अचानक रस्ता रोको आंदोलन सुरू केले. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघन, शहरचे निरीक्षक संदीप रणदिवे पोलिसांनी धाव घेत सौम्य लाठीचार्ज करीत जमावाला पांगवले.

दिडशे जणांच्या जमावाविरोधात गुन्हा
भुसावळात बेकायदा आंदोलन करून रास्ता रोको केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपठ पोलिसात गोपनीय विभागाचे हवालदार संदीप परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 130 ते 150 अनोळखीविरोधात जमावबंदी कायद्याचे उल्लंघण केल्यााप्रकरणी तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार रवींद्र भावसार करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !