ट्रेडींगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने भुसावळातील तरुणीला तीन लाखांचा गंडा


A girl from Bhusawal was extorted with three lakhs for the lure of investing in trading भुसावळ : शेअर मार्केटमध्ये ट्रेडींग केल्यास अधिक परतावा मिळेल, असे सांगून भुसावळातील तरुणीची तब्बल तीन लाख दोन हजार 498 रुपयात फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी त्रिकूटाविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
श्रृती रत्नाकर नंदेश्वर (28, पांडुरंग टॉकीजजवळ, टिंबर मार्केट, भुसावळ) या तरुणीच्या तक्रारीनुसार, 18 ते 22 मे दरम्यान त्यांच्या मोबाईलवर 529 बी.500 ईव्हरीडे या ग्रुपला 8485037394 व 8886140193 या क्रमांकावरून जॉईन करण्यात आले व तुम्हाला टेलिग्रामवर जॉईन केले असल्याचे सांगून कॉईन्सविचची लिंक पाठवून त्यात तक्रारदाराला खाते उघडण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला नंदेश्वर यांच्या खात्यावर भामट्यांनी 180, 550, 6000 रुपये जमा करून त्यांचा विश्वास मिळवला.

त्यानंतर पाचशे, दोन हजार, वीस हजार प्रमाणे एकूण तीन लाख दोन हजार 498 रुपये विश्वासाने भरण्यास सांगून ते परत न करता फसवणूक करण्यात आली. पैसे परत मिळत नसल्याने व फसवणूक झाली असल्याचे स्पष्ट होताच नंदेश्वर यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेत आपबिती सांगितली. याप्रकरणी मोबाईल क्रमांक धारक 84850-37394 व 88861-40193 वामिका विनावा, हेमंत कुमार निशाद, आमीद रामदास बीडकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु सांगळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !