स्टेट बँकेतून बोलत असल्याचे भासवत भुसावळातील महिलेला दोन लाख 29 हजारांचा गंडा


A woman from Bhusawal, pretending to be speaking from the State Bank, was swindled for two lakhs and 29 thousand भुसावळ :स्टेट बँकेच्या क्रेडीट कार्ड सर्विसमधून बोलत असल्याचे भासवून भुसावळातील 56 वर्षीय महिलेला तब्बल दोन लाख 29 हजारांचा गंडा घालण्यात आला. 9 जून 2024 रोजी ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञात मोबाईल क्रमांक धारकाविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
शुभांगी सिद्धेश पाटील (56, प्लॉट क्रमांक 29, बीपीसी बँक कॉलनी, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, 9 जून रोजी दुपारी 12.48 वाजता त्यांना मोबाईल 8017802865 वरून कॉल आला व समोरून इसमाने एसबीआय क्रेडीब् कार्ड विभागाच्या कस्टमर केअर विभागातून बोलत असल्याचे भासवले. आपल्या खात्याचे रीफंड पैसे आल्याचे सांगून एक एपीके फाईल पाठवत असल्याचे भामट्याने सांगून त्यात विचारलेली संपूर्ण माहिती भरून पाठवण्याचे सांगितले. शुभांगी पाटील यांनी भामट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत आलेल्या फाईलवर सर्व माहिती भरून संबंधिताला पाठवली. याच दिवशी दुपारी दिड वाजेच्या सुमारास खात्यातून सुरूवातीला 29 हजार व काही वेळेत दोन लाख रुपये खात्यातून कट झाल्याचा मेसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी गुरुवारी शहर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !