पॉलिसी रक्कम परत करण्याच्या बहाण्याने भुसावळातील रेल्वे कर्मचार्‍याला 11 लाखांचा गंडा


11 lakhs extorted from a railway employee in Bhusawal on the pretext of returning the policy amount भुसावळ : वडिलांच्या नावे असलेल्या पॉलिसीची रक्कम परत करण्याच्या बहाण्याने भुसावळातील रेल्वे कर्मचार्‍याला तब्बल 11 लाखांचा गंडा घालण्यात आला. 8 मार्च ते आजपावेतो झालेल्या फसवणूक प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
प्रसाद किशोर कुलकर्णी (36, प्राची अपार्टमेंट, तुळशीनगर, भुसावळ) हे रेल्वे कर्मचारी आहेत. त्यांच्या वडिलांच्या नावे असलेली पॉलिसीची रक्कम परत मिळण्याच्या बहाण्याने भामट्याने मोबाईल क्रमांक 77019-22435 व 88513-50319 वरून संपर्क साधत भारतीय राजमुद्रा असलेले बनावट कागदपत्र व्हॉटसअ‍ॅपवर पाठवले.

कुलकर्णी यांचा त्यावर विश्वास बसल्याने त्यांनी ऑनलाईन भामट्याने सांगितल्याप्रमाणे एकूण दहा लाख 74 हजार 194 रुपये पाठवले. रक्कम भरूनही पॉलिसीची रक्कम मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री कुलकर्णी यांना झाल्यानंतर त्यांनी जळगाव सायबर पोलिसात धाव घेतल्यानंतर भालचंद्र व रामचरण नाव सांगणार्‍या भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !