कामावरून काढल्याच्या रागातून निंभोर्यात सुरक्षा रक्षकाला मारहाण
भुसावळ : वडिलांना कामावरून काढल्याच्या रागातून सुरक्षा रक्षकाला शिविगाळ करीत दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना निंभोरा ग्रामपंचायतीसमोर गुरुवारी दुपारी 12.10 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
विशाल सतीश महाजन (27, फेकरी) हे सुरक्षा रक्षक असून संशयीत दुर्गेश रामदास कोलते (निंभोरा) यांच्या वडिलांना कामावरून काढल्याच्या रागातून संशयीत दुर्गेशने शिविगाळ करीत दमदाटी केली तसेच हातात दगड घेवून तक्रारदाराच्या पाठीवर व ओठावर मारहाण केली. महाजन यांच्या तक्रारीवरून दुर्गेश कोलतेविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.

