भुसावळात पाच पोलीस कर्मचार्‍यांचा पुरस्काराने गौरव


भुसावळ : प्रत्येक पोलीस कर्मचार्‍याने कर्तव्यावर असतांना चांगले काम करावे, पोलीस विभागाचे नाव उज्वल करावे, जेणेकरून आपल्या पोलीस स्टेशनचे नाव उज्वल होईल, पाच कर्मचार्‍यांचा गौरव करतांना त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक वाटत असल्याचे प्रतिपादन डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी केले. पोलीस उपअधीक्षक कार्यालयात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात गुन्हेगारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी शहर पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे, नशिराबाद पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेतील ज्या कर्मचार्‍यांनी उत्कृष्ठ कामे केली आहे अश्या कर्मचार्‍यांचा गौरव करण्यात आला. या कर्मचार्‍यांना एम्प्लॉई ऑफ द मंथ पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.

अन्य कर्मचार्‍यांनीही मिळवावा पुरस्कार
डीवायएसपी पिंगळे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, या पाच कर्मचार्‍यांनी ज्या प्रमाणे उत्कृष्ठ कामे केली आहे, त्याच पध्दतीने अन्य पोलीस कर्मचारी यांनी सुध्दा कामे करून हा पुरस्कार मिळवावा. यावेळी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघन, निरीक्षक बबन जगताप, शहर वाहतूक शाखेच्या सहायक निरीक्षक रूपाली चव्हाण, नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रामेश्वर मोताळे व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे गणेश धुगे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे दिलीप कोल्हे, तालुका पोलीस ठाण्यातील शिवाली खंडारे, नशिराबाद पोलीस ठाण्यातील हेमंत मिटकरी, शहर वाहतूक शाखेतील विजया सपकाळे यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.



नशिराबादचे पोलीस ठाण्याचे पाच प्रस्ताव
नशिराबादमधील गुन्हेगारांवर वचक राहावा, गुन्हेगारीवर आळा बसावा यासाठी सहायक निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी मोक्का अंतर्गत पाच प्रस्ताव पाठविले. या उल्लेखनिय कामगिरीबद्दल सहायक निरीक्षक मोताळे यांचा विशेष गौरव करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या मोक्काच्या प्रस्तावांपैकी 25 टक्के प्रस्ताव केवळ नशिराबादचे आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !