भुसावळातील दुहेरी हत्याकांड : सहावा संशयीत नितीन पथरोड बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात


Bhusawal double murder case : Sixth suspect Nitin Pathroad market in police net भुसावळ : भुसावळचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची पूर्व वैमनस्यातून गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील पसार आरोपी नितीन पथरोड (भुसावळ) यास वरणगावजवळून बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हत्येला वादाची किनार : दहा संशयीतांविरोधात गुन्हा
भुसावळातील संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची बुधवार, 29 मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना जुना सातारा भागात घडली होती. हत्येप्रकरणी संशयीत राजू सूर्यवंशी, बंटी पथरोड, शिव पथरोड, विष्णू पथरोड, विनोद चावरीया, सोनू पंडित, करन पथरोड, नितीन पथरोडसह अन्य दोन ते तीन अनोळखीविरोधात शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून शनिवारी नितीन पथरोड यास अटक करण्यात आल्यानंतर आरोपींची संख्या सहा झाली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजानन पडघन यांना संशयीताबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. शनिवार दि. 22 जून रोजी दुपारी संशयित नितीन पथरोड याला सापळा रचून अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर, यासीन पिंजारी, महेश चौधरी, जावेद शाह, सचिन चौधरी, प्रशांत सोनार आदी कर्मचार्‍यांनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !