भुसावळातील आशिष खरातसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
भुसावळ : शहरातील समता नगरातील रहिवासी आशिष रवींद्र खरात आणि विवेक शेळके यांनी शुक्रवार, 21 रात्री 8 वाजेच्या सुमारास एका जणास दारू पिण्यास पैसे मागितले असता त्याने नकार दिल्याने खरात आणि शेळके यांनी त्यास मारहाण करीत शिवीगाळ केली. या प्रकरणी संबंधिताने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून खरात आणि शेळके विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.

