साकळी गावातील 55 वर्षीय शेतकर्याला दोघांची मारहाण
A 55-year-old farmer of Sakli village was beaten up by two people यावल : माझ्या 14 आर क्षेत्रात का पेरले? विचारल्याच्या रागातून दोघांनी शेतकर्याला शिवीगाळ करीत मारहाण केली तसेच भाजी कापण्याची सुरी व लाकडी टोकराने मारून दुखापत केली. ही घटना शनिवारी रात्री साकळी गावात घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रविवारी दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
साकळी गावातील आंबेडकर चौकात पांडुरंग नामदेव मराठे (55, हनुमान पेठ, साकळी) हे शेतकरी उभे असताना तेथे सुभाष भास्कर महाजन व कांतीलाल महाजन (दोघे रा.साकळी) हे आले. पांडुरंग मराठे यांनी महाजन यांना सांगितले की, माझ्या नावावर 14 आर.क्षेत्र शिल्लक राहिलेले आहे. त्या शेतात तुम्ही का पेरले ? या बोलण्याच्या कारणावरून दोघांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली व भाजी कापण्याची सूरी व लाकडी टोकराने मारून दुखापत केली. ही घटना शनिवारी रात्री 9 वाजेला घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पांडुरंग मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.

