कोळवद गावातील 65 वर्षीय वृद्धाला एकाची जबर मारहाण


A 65-year-old man from Kolvad village was severely beaten by one यावल : यावल तालुक्यातील कोळवद येथे 65 वर्षीय वृद्धाला काही एक कारण नसतांना एकाने शिविगाळ करून मारहाण केली आणि लाकडी दांड्याने त्यांच्या डोळ्याजवळ मारून दुखापत केली. ही घटना बुधवार, 19 जुन रोजी रात्री दहा वाजता घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मंगळवारी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाविरोधात गुन्हा दाखल
कोळवद गावातील भगीरथ पंढरीनाथ सूर्यवंशी (65) हे गल्लीत उभे असताना अजय गोबा चौधरी (रा.कोळवद) हा आला व त्याने काही एक कारण नसतांना सूर्यवंशी यांना शिवीगाळ करून मारहाण करीत लाकडी दांड्याने त्यांच्या उजव्या डोळ्याजवळ मारून दुखापत केली. जखमी अवस्थेत भगीरथ सुर्यवंशी यांना उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी उपचार केल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अजय चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !