भुसावळातील दुहेरी हत्याकांड : सातवा संशयीत सोनू पंडित बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात
Bhusawla double murder : Seventh suspect Sonu Pandit market in police net भुसावळ : भुसावळचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची पूर्व वैमनस्यातून गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील पसार आरोपी सोनू रायसिंग पंडित (वाल्मीक नगर, भुसावळ) यास भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून गुरुवारी रात्री 11 वाजता अटक करण्यात आली. दुहेरी हत्याकांडात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली.
हत्येला वादाची किनार : दहा संशयीतांविरोधात गुन्हा
भुसावळातील संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची बुधवार, 29 मे 2024 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना जुना सातारा भागात घडली होती. हत्येप्रकरणी संशयीत राजू सूर्यवंशी, बंटी पथरोड, शिव पथरोड, विष्णू पथरोड, विनोद चावरीया, सोनू पंडित, करन पथरोड, नितीन पथरोडसह अन्य दोन ते तीन अनोळखीविरोधात शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली होती तर गुरुवारी कुटूंबियांना भेटण्यासाठी सोनू पंडित येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास सापळा रचून अटक करण्यात आली.

आरोपी येताच आवळल्या मुसक्या
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजानन पडघन यांना संशयीत सोनू पंडित हा कुटूंबियांना भेटण्यासाठी गुरुवारी रात्री येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. गुरुवार, 27 जून रोजी रात्रभ 11 वाजता संशयीत सोनू पंडित यास अटक करण्यात आली व संशयीताला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रमण सुरळकर, हवालदार उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल अमर आढाळे, शिपाई प्रशांत लाड, शिपाई प्रशांत सोनार, चालक दिनेश कापडणे, भुसावळ शहरचे शिपाई राहुल भोई आदींच्या पथकाने केली.
