रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा : ब्लॉकमुळे रद्द झालेल्या आठ रद्द रेल्वे गाड्या पूर्ववत धावणार !
भुसावळ : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड आणि मनमाड विभागातील पुणतांबा आणि कान्हेगाव स्थानकांदरम्यान दुहेरीकरण सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कार्यासाठी ब्लॉक घेण्यात आल्याने काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या मार्गात परिवर्तन करण्यात आले होते मात्र रेल्वे गाड्या पूर्ववत करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.
या गाड्या पूर्ववत धावणार
गाडी क्रमांक 22223 मुंबई-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस 29 व 30 रोजी धावेल तर गाडी क्रमांक 22224 साई नगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस 29 व 30 रोजी धावेल. गाडी क्रमांक 22147 दादर-साईंनगर शिर्डी साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस शुक्रवार, 28 रोजी धावणार आहे तर गाडी क्रमांक 22148 साईंनगर शिर्डी-दादर साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस 29 जून 2024 रोजी धावणार आहे. गाडी क्रमांक 12131 दादर-साईनगर शिर्डी त्रि-साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस 29 जून 2024 रोजी धावेल तर गाडी क्रमांक 12132 साईनगर शिर्डी-दादर त्रि-साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस 30 जून 2024 रोजी धावणार आहे. गाडी क्रमांक 11041 दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस (व्हाया पुणे) 29 रोजी तसेच गाडी क्रमांक 11042 साईनगर शिर्डी -दादर एक्स्प्रेस 30 रोजी धावणार आहे.

या गाड्या नियमित मार्गाने धावणार
गाडी क्रमांक 17629 पुणे-नांदेड एक्स्प्रेस 28 व 29 रोजी आपल्या नियमित मार्गाने धावणार आहे. गाडी क्रमांक 17630 नांदेड-पुणे एक्स्प्रेस 29 ते 30 जून 2024 पर्यंत रोजी आपल्या नियमित मार्गाने धावणार आहे. गाडी क्रमांक 11078 जम्मूतवी-पुणे झेलम एक्स्प्रेस 27 व 28 जून 2024 रोजी आपल्या नियमित मार्गाने धावेल आणि पुण्याला जाणार आहे. गाडी क्रमांक 12780 हजरत निजामुद्दीन-वास्को गोवा सुपरफास्ट एक्सप्रेस 28 आणि 29 जून 2024 रोजी आपल्या नियमित मार्गाने धावणार आहे.
चार गाड्या निर्धारीत ठिकाणी पोहोचणार
गाडी क्रमांक 17002 सिकंदराबाद-साईनगर शिर्डी द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस 28 जून 2024 रोजी साईनगर शिर्डी येथे जाईल तर गाडी क्रमांक 17001 साईनगर शिर्डी-सिकंदराबाद द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस 29 जून 2024 रोजी साईनगर शिर्डी येथून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल. गाडी क्रमांक 20857 अप पुरी-साईंनगर शिर्डी साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस 28 जून 2024 रोजी साईनगर शिर्डीला पोहोचणार आहे तर गाडी क्रमांक 20858 डाऊन साईनगर शिर्डी-पुरी साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस 30 जून 2024 रोजी साईनगर-शिर्डी आपल्या निर्धारित वेळेत सुटणार आहे.