अकलूद बस स्थानकावर 54 वर्षीय इसमाला तिघांची मारहाण


यावल : यावल तालुक्यातील अकलूद गावातील बस स्थानकावर 54 वर्षीय इसम एका लग्नामध्ये झालेल्या भांडणासंदर्भात चर्चा करीत असताना या कारणावरून त्याला तिघांनी शिविगाळ करून मारहाण केली व फायटरने आणि लाकडी दांड्याने मारून दुखापत केली. ही घटना बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा
अकलूद, ता.यावल येथील बस स्थानकावर गोपाळ बारकू सपकाळे (54) हे उभे होते व ते विशाल सपकाळे यांच्या मावस भावाच्या लग्नात झालेल्या भांडणा संदर्भात बोलत होते. या रागातून संजय धुळकू सपकाळे, गोविंदा संजय सपकाळे व विशाल युवराज सपकाळे (तिन्ही रा.कासवा, ता.यावल) या तिघांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली तसेच लाकडी दांड्याने आणि फायटरने मारून दुखापत केली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश चौधरी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !