भरधाव झायलोच्या धडकेत वरणगावातील विद्यार्थ्याचा मृत्यू


वरणगाव : फुलगाव येथील टेक्नीकल विद्यालयातून घराकडे परतणार्‍या विद्यार्थ्याला भरधाव चारचाकीने धडक दिल्याने त्याचा जागीच करुण अंत झाल्याची घटना बुधवारी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल आस्वादसमोर घडली. या अपघातात रोहित सुनील इंगळे (17) हा विद्यार्थी जागीच ठार झाला. सूत्रांच्या माहितीनुसार रोहित हा आपल्या मित्रासह फुलगाव येथील टेक्नीकल विद्यालयातून दुचाकीने वरणगावकडे येत असताना हॉटेल आस्वादजवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या झायलो कारने धडक दिल्याने दुचाकीस्वारामागे बसलेला रोहित जमिनीवर पडला व डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !