अकलूदच्या लक्ष्मी नगरातून चक्क इलेक्ट्रीक डीपीच लांबवली : एकाविरोधात गुन्हा
यावल : यावल तालुक्यातील अकलूद या गावातील प्लॉट भागात लक्ष्मी नगरामध्ये बसवण्यात आलेल्या दोन इलेक्ट्रिकल डी.पी. एका तरुणाने चोरी केल्या. दोन लाख 90 हजार रुपये किंमतीच्या या डीपी होत्या. ही चोरीची घटना 2 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली होती. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात शुक्रवार, 28 रोजी रात्री एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयीताविरोधात गुन्हा दाखल
अकलूद, ता.यावल गावातील प्लाट भागात नव्याने लक्ष्मी नगर विस्तारीत करण्यात आले आहे. विष्णू गुलाबराव नारा यानीं दोन इलेक्ट्रिकल डीपी बसवल्या मात्र ऑक्टोबर 2023 मध्ये संशयीत तुषार पुंडलिक पाटील (जळगाव) यांनी त्या दोन्ही डीपी चोरी करून नेल्या. दोन लाख 90 हजार रुपये किंमतीच्या या डीपी त्यांनी चोरी केल्या. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात विष्णू नारा यांच्या फिर्यादीवरून तुषार पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे साहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मयनोद्दीन सय्यद करीत आहे.

