प्रेयसीचे दुसर्याशी सुत जुळताच केली हत्या : चोपड्यातील प्रियकराला बेड्या
Beloved killed while having sex with someone else : Lover in Chopda shackled चंद्रपूर : कुष्ठरोग्यांची सेवा ही जनसेवा म्हणून कार्य करणार्या आनंदवनातील आश्रमात 24 वर्षीय तरुणीचे केयरटेकरशी सूत जुळले मात्र काही दिवसातच तरुणीचे पुन्हा अन्य एकाशी सूत जमले व पहिल्या प्रियकराला ही बाब कळताच त्याने प्रेयसीची चाकूने हत्या केली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात ही घटना घडली. आरती दिगंबर चंद्रवंशी (24) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे तर समाधान माळी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो मूळचा चोपडा तालुक्यातील रहिवासी आहे.
24 तासात आरोपी जाळ्यात
बुधवार, 26 जून ला रात्रीच्या सुमारास आनंद वनातील आश्रमात राहणार्या 24 वर्षीय आरतीची आरोपी समाधानने चाकूने वार करीत हत्या केली. पोलिलसांना माहिती मिळाल्यावर अवघ्या 24 तासात आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला.

आश्रमात जुळले प्रेम
कुष्ठरोग्यांची सेवा ही जनसेवा म्हणून कार्य करणार्या आनंदवनातील आश्रमात मृतक मुलीचे आई-वडील राहत असताना त्यांच्यासोबत 24 वर्षीय आरती ही राहत होती. आई-वडिलांचा उपचार करतेवेळी आरतीच्या नजरा जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात राहणार्या समाधान माळीसोबत जुळल्या. समाधान हा स्वतःचा उपचार आनंदवनात करण्यासाठी आला होता, विशेष म्हणजे उपचार घेत तो केअर टेकरचे कामही करायचा.
आनंदवनाच्या या आश्रमात समाधान व आरतीचे प्रेमसंबंध सुरू झाले. सहा महिने दोघेही प्रेमाच्या सागरात बुडाले होते मात्र त्यानंतर आरतीचे लक्ष भरकटले व दुसर्या युवकासोबत तिचे प्रेम संबंध जुळले. याची चाहूल समाधानला लागली, त्यानंतर दोघात वाद सुरू झाले, समाधान आरतीला म्हणाला की जर तुला माझ्या प्रेमाची गंमत करायची होती तर प्रेमात आणाभाका कशाला घ्यायला लावल्या, यावरून दोघांचे वाद झाले व 26 रोजी आरतीचे आई-वडिल सेवाग्राम येथे गेल्यानंतर आरोपीने आरतीच्या घरी प्रवेश करीत तिची हत्या केली.
यांनी आवळल्या मुसक्या
वरोरा पोलीस निरिक्षक अमोल काचोरे, एपीआय विनोद जांभळे, पोलीस उपनिरीक्षक धीरज मसराम, दिलीप सुर, दीपक दुधे, किशोर बोधे, पोलीस अंमलदार मोहन निषाद, शशांक बदामवार, महेश गवतूरे, रोशन तमशेट्वार आदींनी ही कारवाई केली.
