पोलीस निरीक्षकांचा हृदयविकाराने मृत्यू


वर्धा :  हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलिस ठाण्यातील निरीक्षक मनोज वाढीवे (46) यांचा मृत्यू ओढवला. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. कर्मचारी सातत्याने निरीक्षकांना फोन लावत होते मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने खातरजमा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

विश्रांतीला गेल्यानंतर आला हृदयविकाराचा झटका
काही महिन्यांपूर्वीच मनोज वाढीवे धामणगाव (ता. मोर्शी जिल्हा अमरावती) यांनी स्वीकारली होती. शुक्रवारी रात्री पोलिस ठाण्यातील कामकाज आटोपून शासकीय निवासस्थानी विश्रांतीकरिता गेले होते. शनिवारी कर्मचार्‍यांनी पोलिस निरीक्षक मनोज वाढीवे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळत नसल्याने, कर्मचार्‍यांनी शासकीय निवासस्थानी धाव घेत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. शेवटी कर्मचार्‍यांनी दार तोडले आणि निवासस्थानात प्रवेश करताच पोलिस निरीक्षक मनोज वाढीवे मृतावस्थेत आढळले.



त्यांच्या पार्थिवावर मूळ गाव धामणगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वाढीवे हे अतिशय मनिमळावू असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. त्यांच्या निधनाने अमरावती जिल्ह्यातील पोलिस दलातमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !