रावेर बंजारा समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
रावेर : हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती निमित्त रावेर शहरात बंजारा समाजातर्फे पाराचा गणपती मंदिरापासून स्वामी विवेकानंद विद्यामंदिर पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर तालुकातील बंजारा समाजाचे दहावी-बारावी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव करण्यात आला. या प्रसंगी बंजारा समाजाचे दफडा वाद्य मुख्य आकर्षण ठरले.
130 गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
अध्यक्षस्थानी आश्रमाचे संत श्री दिव्य चैतन्य महाराज होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, युवा नेते धनंजय चौधरी, डॉ. केतकी पाटील, यावलचे माजी सभापती भरत महाजन, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, वनक्षेत्रपाल अजय बावणे, सारीका चव्हाण, माजी सरपंच अर्जुन जाधव, स्वामी शैक्षणिक संस्थेचे रवींद्र पवार, सभापती सचिन पाटील आदींची उपस्थिती होती. पाल, लोहारा, जुनोने, लालमाती, कुसुंबा, ऐनपुर, आभोडा तांडा, गुलाबवाडी, केर्हाळा, रावेर आणि वेगवेगळ्या तांड्यातून विद्यार्थी आणि समाजबांधव उपस्थित होते. 130 गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रसंगी सत्कार करण्यात आला.

यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी बंजारा समाज विद्यार्थी परिषदेचे दिनेश पवार, साई राठोड, दिलीप राठोड, आर्यन चव्हाण, विकास चव्हाण, तेजस वंजारी, रोहन, दीपक, रोहित, अक्षय कृष्णा, ऋषिकेश, गोविंद, सुदाम, जीवन, हर्षल, सुमित इ. कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रीय बंजारा टायगरचे जिल्हाध्यक्ष संतोष राठोड तालुकाध्यक्ष सुरेश पवार, इंटरनॅशनल स्कूलचे महेंद्र पवार, रमेश राठोड, राजु पवार यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक विनय पवार तर विजय पवार सूत्रसंचालन केले. रमेश राठोड यांनी आभार प्रदर्शन मानले.




