भुसावळातील दुहेरी हत्याकांडातील संशयीत बंटी पथरोडच्या दोन वाहनांना अज्ञातांनी पेटवले


भुसावळ  : भुसावळातील दुहेरी हत्याकांडातील संशयीत बंटी पथरोड वापरत असलेल्या दोन महागड्या कार अज्ञातांनी मध्यरात्री पेटवून दिल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात नोंद नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

मध्यरात्री पेटवली वाहने
भुसावळचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्या हत्याकांडात संशयीत बंटी पथरोडचेदेखील नावे असून तो सध्या पसार आहे. संशयीत राहत असलेल्या जामनेर रोडवरील वाल्मीक नगर परिसरात झायलो व इको वाहन पार्क केल्या होत्या मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी या वाहनांना ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली. प्रभारी निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली मात्र या संदर्भात कुणाचीही तक्रार नसल्याने गुन्हा दाखल नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !