चोरीच्या तीन दुचाकींसह अट्टल चोरटा रावेर पोलिसांच्या जाळ्यात


Attal thief with three stolen bikes in Raver police net रावेर : रावेर पोलिसांनी चोरीच्या तीन दुचाकीसह परप्रांतीय चोरट्याला शहरातील छोरीया मार्केट परिसरातून अटक केली आहे. यश प्रकाश देशमुख (21, रा.शिरूर दिगर, ता.शहादा, ह.मु.विद्यानगर, रावेर) यांची दुचाकी 2 जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास चोरीस गेल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून तपास सुरू असताना दुचाकी चोरटा छोरीया मार्केट येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवार, 3 जुलै रोजी सापळा रचून चोरट्याला अटक करण्यात आली. जगराम यारसिंह बारेला (19, रा.शहापूर, ता.बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

तीन दुचाकी जप्त
आरोपी बारेला याने यश देशमुख यांची चोरी केलेली दुचाकी काढून दिली तसेच अन्य दोन दुचाकीदेखील काढून दिल्या. ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर निरीक्षक विशाल जयस्वाल, नाईक किशोर सपकाळे, समाधान ठाकूर, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !