दिब्रुगड एक्स्प्रेसचे 10 डबे रुळावरून घसरले : दोन प्रवासी ठार


चंदीगड : चंडीगड येथून आसामला जाणार्‍या दिब्रुगड एक्स्प्रेसचे 10 डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

जीव मुठीत घेवून प्रवासी बाहेर
चंडीगड येथून दिब्रुगडला जाणारी ट्रेन क्रमांक 15904 दिब्रुगड एक्स्प्रेस ही गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गोंडा जंक्शन येथून पुढच्या प्रवासाला निघाली होती. मात्र काही वेळातच दुपारी 2.30 च्या सुमारास गोंडापासून 20 किमी अंतरावर या ट्रेनला अपघात झाला. या अपघातात ट्रेनचे दोन डबे रुळावरून पूर्णपणे घसरले. तर इतर काही डबेही अपघातग्रस्त झाले. अपघातग्रस्त डब्यांमधून प्रवाशी जीव मुठीत धरून बाहेर पडले.


कॉपी करू नका.