खंडीत वीजपुरवठ्याचा रहिवाशांना मनस्ताप : भुसावळात काँग्रेसचे निवेदन


भुसावळ : एमआयडीसी फिडरवरून वरणगाव रोड, शिवाजी नगर, आगाखान वाडा, पंधरा भागात भागात वीजपुरवठा केला जातो मात्र सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने रहिवासी त्रासले आहेत. या संदर्भात दखल घ्यावी, अशी मागणी काँग्रेस पदाधिकारी वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता जयंत भामरे यांच्याकडे केली.

कायमस्वरुपी समस्या सुटावी
निवेदनाचा आशय असा की, वीज कंपनीच्या गलथान कारभारामुळे रहिवासी वैतागले आहेत. या भागातील वीजपुरवठा दिवसातून कमीत-कमी पाच वेळा खंडित होतो व तो दीर्घ काळासाठी खंडित राहत असल्याने हा प्रकार बंद करावा तसेच खंडित वीजेमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला असून रस्त्यावरून पायदळ चालणे अशक्य होते शिवाय या भागात नगरपालिकेचे पाणी पंधरा दिवसातून एक वेळा येते मात्र त्याचवेळी वीज गुल होत असल्याने नागरिकांना पाण्याचा साठा करताना मोठी अडचण निर्माण होते शिवाय अंधारामुळे अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


यांची होती उपस्थिती
निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मो.मुनव्वर खान, शहर काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष सलीम गवळी, जिला उपाध्यक्ष मेहेबूब खान, सेवादल शहराध्यक्ष संजय खडसे, शहर उपाध्यक्ष जॉनी गवली, जिल्हा सचिव हमीद सर, महिला शहराध्यक्ष यास्मीन बानो, हमीदा गवली, सायरा बानो, महेर नीसा, मो.खालीद खान, शीला परदेशी, ईद्दा अन्ना, जकपाल सिंह, यास्मीन कुरैशी, भारतीय परदेशी व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !