भुसावळातील भूमिगत गटारी, सांडपाणी व्यवस्थानासाठी 390 कोटींचा तांत्रिक मान्यता प्रस्ताव सादर


भुसावळ  : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरात भूमिगत गटारी, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून 390 कोटी 15 लाख 96 हजार 347 रुपयांचा तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव मध्यवर्ती नियोजन व संकल्पचित्र व सनियंत्रण विभागाकडे सादर करण्यात आला आहे. या योजनेमुळे आगामी काळात शहरातील सर्व गटारी बंदिस्त होतील तर शहरातून निघणार्‍या सांडपाण्यामुळेे तापी नदी प्रदूषित होणार नाही.

योजनेला लवकरच मिळणार मंजुरी
भुसावळ शहरात भूमिगत गटारी नसल्याने नाल्यांमधून सांडपाणी थेट तापीनदीत मिसळून नदीचे प्रदूषण होते. भूमिगत वाहिनीसाठी दरडोई 135 लीटर पाणीपुरवठा करण्याचे निकष आहेत. आगामी काळात अमृत योजनेतून हे निकष पूर्ण होणार असल्याने भूमिगत गटारीची आवश्यकता होती. यामुळे पालिकेने नागपूर येथील सीमेन्स टेक लिमिटेड या कंपनीकडून डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार केला होता. यानंतर आता तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव सल्लागार एजन्सी एमजीपीच्या माध्यमातून मुंबईतील मध्यवर्ती नियोजन व संकल्पचित्र विभागाकडे देण्यात आला आहे. या योजनेलाही लवकरच मंजुरी मिळून आगामी काळात कामे सुरू होतील, अशी माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !