लासलगांव-ईगतपुरी विभागाचे डीआरएम यांच्याकडे विंडो निरीक्षण


भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या डीआरएम ईती पाण्डेय यांनी शुक्रवार, 26 रोजी भुसावळ-ईगतपुरी खंडाचे विंडो ट्रेलिंगद्वारे स्टेशन्सचे निरीक्षण केले. विंडो ट्रेलिंग निरीक्षणा दरम्यान गाडी संचालनाशी संबंधित सर्व संरक्षा मानकांचे, स्टेशन स्वच्छता, ट्रॅक, पूल आणि ओएचईचे अवलोकन करण्यात आले.

विकासकामांना गती देण्याचे निर्देश
डीआरएम पाण्डेय यांनी लासलगांव आणि देवळाली स्टेशनवर अमृत भारत योजनेंतर्गत सुरू असलेल्या कार्याचा निरीक्षण केले. स्टेशन निरीक्षणाच्या वेळी त्यांनी स्टेशनवर सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. सध्या प्रवाशांना दिल्या जाणार्‍या सुविधांचीदेखील त्यांनी समीक्षा केली आणि प्रवाशांच्या प्रवासाच्या अनुभवात सुधारणा करण्यासाठी कामांना गती देण्याचे निर्देश दिले. लासलगांव स्टेशनवर कॅन्टीन स्टॉल, एक स्टेशन एक उत्पाद स्टॉलचे निरीक्षण करण्यात आले. देवळाली स्टेशन येथे स्टेशन, प्लॅटफॉर्म, स्टेशन परिसर येथे निरीक्षण करण्यात आले. तसेच नाशिक रोड येथे माल गोदामाचे निरीक्षण करण्यात आले. या निरीक्षणादरम्यान संबंधित शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !