केंद्राकडून वरणगाव शहरास ओडी फ्रीचा दर्जा
वरणगाव : केंद्र सरकारने वरणगाव शहराला ओडीएफ प्लस प्लस दर्जा जाहीर केल्याने वरणगावकरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. वरणगाव नगरपरीषर्देतर्फे शहरातील सार्वजनिक शौचालयात दिव्यांगांसाठी रॅम्प, महिलांसाठी व मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन मिळण्याचे व नष्ट करण्याचे मशीन, हॅण्डवाश, दिशादर्शक फलक, आरसा, बेसीन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सर्व सुविधांची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक येवून गेले. त्यानुसार केंद्राने वरणगाव शहरास ओडीफ प्लस प्लसचा दर्जा दिला आहे. या दर्जामुळे वरणगाव नगरपरीषदेला विविध विकासकामांसाठी भरीव निधी मिळणार असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले. वरणगाव शहरास हा दर्जा मिळवण्यासाठी शहरातील सर्व नागरीकांचे, सर्व नगरपरीषद कर्मचार्यांचे विशेषतः आरोग्य विभागाचे खूप सहकार्य लाभले. नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकरी शाम गोसावी, पाणीपुरवठा स्वच्छता अभियंता गणेश चाटे, दीपक भंगाळे यांच्यासह महेंद्र मोरे, गोकुळ भोई, लड्डा पहेलवान, सुनील तायडे, रींकू इंगळे, गौतम इंगळे यांच्या मार्गदर्शनामुळे हा दर्जा मिळवणे शक्य झाले.
