भुसावळ बेकायदा दारू विक्री : आरोपीला अटक


भुसावळ : शहरातील मॉडर्न रोडवरील अग्रेसन भवनाच्या आडोश्याला सार्वजनिक ठिकाणी बेकायदा देशी-विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरून बाजारपेठ पोलिसांनी कारवाई करीत गणेश कडुबा बाविस्कर (32, रा.दिनदयाल नगर, नाहाटा कॉलेजजवळ, भुसावळ) यास अटक केली. आरोपीच्या ताब्यातून देशी टँगो कंपनीच्या दोन हजार 444 रुपये किंमतीच्या 47 बाटल्या तसेच ट्युबर्ग कंपनीच्या एक हजार 980 रुपये किंमतीच्या 12 बिअर बाटल्या असा एकूण चार हजार 424 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. गुरुवारी रात्री 8.20 वाजता ही कारवाई करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, महेश चौधरी, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, तुषार पाटील, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींनी ही कारवाई केली. आरोपीविरूद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यासीन पिंजारी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !