राजधानी एक्स्प्रेसला भुसावळ स्थानकावर तांत्रिक थांबा द्यावा


रेल्वे मंत्र्यांकडे माजी मंत्री खडसेंसह खासदार रक्षा खडसेंची मागणी

मुक्ताईनगर : राजधानी एक्स्प्रेसला भुसावळ रेल्वे स्थानकावर तांत्रिक थांबा देण्याची मागणी माजी महसूलमंत्री एकनाथरावजी खडसे व खासदार रक्षाताई खडसे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे नुकत्याच घेण्यात आलेल्या भेटीत केली. आठवड्यातून चार दिवस 22221/22222 राजधानी एक्सप्रेस मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून धावते. या गाडीला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याने आठवडेभर ही गाडी सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली.

भुसावळला द्यावा तांत्रिक थांबा
राजधानीला जळगाव स्थानकावर थांबा देण्यात आला असलातरी पाणी भरणे, चालक दल बदलणे या सुविधा उपलब्ध नाहीी शिवाय या सुविधा येथे उपलब्ध करावयाच्या म्हटल्यास वेळेसह निधीची तरतूद करावी लागणार आहे. जळगाव हे जंक्शन असल्याने पश्चिम रेल्वेकडून नागपूर कडे जाणारी मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक सुरू असते. चालक दलास भुसावळ येथून पाठवावे लागते त्या कारणाने भोपाळ येथे एक्स्प्रेस पोहोचेपर्यंत त्यांच्या कामाच्या तासात वाढ होते याचा परीणाम त्यांच्या कार्यशैलीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भुसावळ येथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. भुसावळ येथे तांत्रिक थांबा दिल्यास वेळ आणि पैश्याची बचत होऊन गाडीला उशीर होण्याची शक्यता नाही, याबाबत रेल्वे मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.




प्रोबेशनंतर पदोन्नतीची मागणी
पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संस्थेमध्ये स्फोटके उपनियंत्रक पदावर प्रोबेशन कालावधी पूर्ण झालेल्या अधिकार्‍यांची पदे कायम करावी आणि स्फोटके उपनियंत्रक पदावरील अधिकार्‍यांना स्फोटके नियंत्रक पदावर पदोन्नती मिळावी तसेच विभागीय पदोन्नती समितीची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणीही करण्यात आली. मागण्यांबाबत सकारात्मक दखल घेण्याचे आश्‍वासन देण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !