अजित पवारांनी स्पष्टच सांगितले : शेतकर्‍यांना वीज बिल भरण्याची गरज नाही


Ajit Pawar clearly said: Farmers do not need to pay electricity bills नाशिक (8 ऑगस्ट 2024) : शेतकरी भावांना वीज बिल भरण्याची आवश्यकता नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. यापुढे शेतकर्‍यांना वीज बिल भरावे लागणार नाही. कनेक्शन कापण्यासाठी वायरमन आल्यास त्याला अजित दादांनी सांगितले असा सांगा, असेदेखील अजित पवार म्हणाले आहेत. लाडक्या बहिणी बरोबरच लाडक्या भावाची देखील राज्य सरकारने काळजी घेतल्याचे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिसून आले आहे.

पाच वर्ष लाडकी बहिण योजना सुरू राहणार !
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काढली आहे. या यात्रेची सुरुवात आज नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून झाली आहे. या वेळी त्यांनी मार्गदर्शन करताना लाडक्या बहिणी आणि लाडका भाऊ दोघांनाही त्यांनी साद घातली. मी दहा वर्ष राज्याचा अर्थमंत्री राहिलो आहे. मी दहा अर्थसंकल्प मांडले आहेत. त्यामुळे कुठे बचत करून योजनांना पैसा देता येतो, हे मला माहिती आहे. लाडकी बहीण योजना ही पुढील पाच वर्ष सुरू राहील, असा दावा देखील अजित पवारांनी केला.


17 पर्यंत दिड कोटींवर बहिणींच्या खात्यात येणार पैसे
अजित दादा म्हणाले की, कालच मी सहा हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही केली. आतापर्यंत सव्वा कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या असून 17 तारखेपर्यंत आकडा दीड ते दोन कोटींवर जाईल, असे देखील अजित पवार म्हणाले. लाडक्या बहिणींनी पैसे खर्च केल्यास बाजारपेठेला चांगला उठाव मिळेल, असा दावा देखील त्यांनी केला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !