श्रावण व चातुर्मासात मांस विक्रीवर बंदी घालावी : जिल्हाधिकार्‍यांना निवेदन


भुसावळ : हिंदू धर्मियांचा सर्वात पवित्र श्रावण महिना सुरू झाला असून महिनाभरात विविध धार्मिक विधी होणार आहे शिवाय जैन धर्मियांचादेखील चातुर्मास सुरू झाला आहे. राज्यभरात या पवित्र पर्वात पशू हत्येवर बंदी आणून मांस, मच्छी तसेच अंडी विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा गो-सेवा मंडळातर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे करण्यात आली.

निवेदन देतेवेळी गोपाळ महाजन, राजेंद्र पाटील, विशाल देवरे, विनायक सोनोने, दीपक पाटील, नाना पाटील, राजेंद्र कोळी आदी गो-सेवक पदाधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !