भुसावळात आज भाजपाचा कार्यकर्ता मेळावा

आमदार संजय सावकारे व केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा सत्कार


भुसावळ भुसावळ (10 ऑगस्ट 2024) : भारतीय जनता पार्टीतर्फे शनिवार, 10 ऑगस्ट रोजी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन शहरातील संतोषी माता हॉलमध्ये दुपारी चार वाजता केले आहे. या कार्यकर्ता मेळाव्याला केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे उपस्थित राहणार असून या मान्यवरांचा सत्कारदेखील केला जाणार आहे. भारतीय जनता पार्टी शहर, ग्रामीण मंडळ, सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !