अज्ञात वाहनाच्या पाचोरा सिमेंट कंपनीतील दोघे कामगार ठार


Two workers of Pachora Cement Company were killed by an unknown vehicle पाचोरा (11 ऑगस्ट 2024) : पाचोर्‍यातील सिमेंट कंपनीतील दोघा कामगारांचा अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने मृत्यू झाला. अपघाताची घटना शनिवार, 10 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन्ही मयत कामगार
सुनील मोतीराम वसावे (25, रा.चानपुरा, ता.अक्कलकुवा , जि.नंदुरबार) आणि योगेश शेवता वळवी (24 वर्ष रा. कोलवान, ता.जिल्हा नर्मदा, गुजरात) अशी मयताचीं नावे असून ते पाचोरा येथील सिमेंट प्रॉडक्ट कंपनीमध्ये ते कामगार होते. शनिवार, 10 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास भडगाव येथून पाचोरा येथे जात असताना त्यांच्या दुचाकी (जीजे 26 ए.एफ.8924) ला अज्ञात भरधाव वाहनाने जोरात धडक दिल्याने दोघे ठार झाले.

अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा
भडगाव पोलिसांनी मृतदेह भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. सिमेंट प्रॉडक्ट कंपनीचे मालक भगवान धरमसिंग राजपूत (28, रा.बांबरुड प्र.चा., ता.पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !