भुसावळात मंत्री रक्षा खडसे यांचा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा पदाधिकार्‍यांकडून सन्मान


भुसावळ (13 ऑगस्ट 2024) : भारतीय जनता पार्टीचा नुकताच कार्यकर्ता मेळावा व सन्मान सोहळा शहरातील संतोषी माता सभागृहात झाला. केंद्रीय राज्यमंत्री निवड झाल्यानंतर खासदार रक्षा खडसे तसेच भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहराध्यक्ष राहुल तायडे व पदाधिकार्‍यांनी यावेळी मंत्री खडसे व आमदार सावकारे यांचा सहृदय सत्कार केला.

प्रसंगी सरचिटणीस संतोष ठोकळ, शहर उपाध्यक्ष अल्बर्ट तायडे, विक्की गोहर, दिनेश बालूरे, राज आठवले, रवींद्रनाथ खरात, दीपक सोनवणे, नरेश खंडारे, अश्विन नरवाडे, शहर चिटणीस संजय नरवाडे, भरत उमरीया, आकाश आव्हाड सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !