विधानसभा लढवायची की उमेदवार पाडायचे 29 ऑगस्ट रोजी ठरवणार : मनोज जरांगे पाटील

भूजबळांना कडक इशारा : तर येवल्यात येऊन पराभूत करून दाखवणार!


Assembly will decide on August 29 whether to contest or drop the candidate : Manoj Jarange Patil नाशिक (14 ऑगस्ट 2024) : मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या राज्यस्तरीय शांतता रॅलीचा समारोप मंगळवारी (दि. 13) नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मनोज जरांगे-पाटील यांनी आपण विधानसभा निवडणूक लढायची की उमेदवारांना पाडायचे याबाबतचा निर्णय येत्या 29 ऑगस्ट रोजी आंतरवली सराटीत घेणार असल्याचे सांगत सर्व समाजबांधवांनी तेथे यावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी त्यांनी छगन भूजबळ यांच्यावर जोरदार टिका करीतमाझ्या नादी लागाल तर याद राखा, येवल्यात येऊन पराभूत करून दाखवू असा सज्जड दमही देत खळबळ उडवून दिली.

पक्षातील नेत्याऐवजी जातीला बाप माना
रॅलीनंतर सीबीएस चौकात उपस्थित मराठा समाज बांधवांना जरांगे पाटील यांनी संबोधीत केले. कोणत्याही नेत्यासाठी किंवा पक्षासाठी नव्हे तर जातीसाठी, आपल्या लेकरांसाठी लढायचे, असा सल्लाही त्यांनी मराठा समाज बांधवांना दिला. मराठा समाजाच्या वेदना सरकारच्या लक्षात येत नाही. पक्षाला, नेत्याला बाप मानन्यापेक्षा जातीला बाप माना असा सल्ला दिला. जरांगे पाटील म्हणाले, निवडणूक आल्यावर भावनिक होवू नका. कोणीही नेता आपला नाही, पक्ष आपला नाही. आरक्षण मिळत नसल्याने आपली लेकरं बाळं मोठी होत नाही. वेळ आली की बदला घ्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


नाशिकमध्ये एकजूट अधिक
जरांगे पाटील म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाने राज्याला दिशा दिली. कडवटपणा काय असतो तो नाशिकच्या समाजबांधवांनी शिकविला, मराठ्यांची कॉलर टाईट केली. मराठवाड्यापेक्षाही येथे एकजूट अधिक दिसून आली. कट्टरपणा काय असतो ते दाखवून दिले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !