साकेगावातील चौघे जुगारी पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ : तालुक्याील साकेगाव येथील मटण मार्केटच्या बाजूला झन्ना मन्ना जुगार खेळताना चौघा जुगारींना अटक करण्यात आली. सोमवारी दुपारी 3.45 वाजता ही कारवाई करण्यात आली. सईद गणी पटेल, संजय दौलत भोई, अनिल चंद्रकांत पाटील, पंकज भिकनराव देशमुख अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, विठ्ठल फुसे, विजय पोहकर, जगदीश भोईर, रीयाज काझी आदींनी ही कारवाई केली.
