निकृष्ट कामामुळे भुसावळातील झेडटीसी बोगद्यात साचले पाणी


भुसावळ (22 ऑगस्ट 2024) : भुसावळ शहर आणि झेडटीसी परिसराला जोडण्यासाठी नवीन बोगदा तयार करण्यात आला मात्र अत्यंत निकृष्ट काम झाल्याने पाऊस नसतांनाही तीन ते चार विविध ठिकाणी अस्वच्छ पाणी जमा होत आहे. कमरेपर्यंत जमा होणार्‍या या पाण्यामुळे रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आह.े यामुळे दररोज अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत.

निकृष्ट कामामुळे संताप
सहाच महिन्यात पाण्यामुळे रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेने रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिल्ली-भुसावळ लाईनवर असलेला जुना रस्ता कायमस्वरुपी बंद करुन त्या ठिकाणी नवीन बोगदा तयार करण्यात आला परंतु, हा बोगदा नवीन समस्या निर्माण करत आहे. पावसामुळे माती वाहून जाते, खड्डेही निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी तर संरक्षक भिंतीतूनच पाणी गळत आहे. त्यामुळे आधीचाच रस्ता सुरक्षित होता, अशी प्रतिक्रिया वाहनधारकांमध्ये उमटत आहे. भुसावळ तालुक्यातील झेडटीसी, फेकरी, दीपनगर अनेक गावांसाठी हा मार्ग सोईस्कर आहे, रोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. त्यांच्या सुरक्षेसाठी एकूणच सुरळीत वाहतुकीसाठी रेल्वे रुळाखालून मार्ग काढत बोगदा तयार करण्यात आला परंतु निकृष्ट कामामुळे या बोगद्यात पाणी साचत आहे. तक्रारी करूनही अधिकारी उपाययोजना करीत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !